भाज्यांचे कोलस्लो

03

Oct
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

कमी कॅलोरीचे भाज्यांचे कोलस्लो

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. घरी बनवलेला कमी कॅलरीजचा मेयोनेझ सारखा सॉस – २०० ग्रॅ
२. गाजर – २
३. कोबी – १०० ग्रॅ
४. मीठ – चवीनुसार
५. मिश्र हर्ब्स / धने-जिरे पावडर – १/२ चमचा (छोटा)
६. चिली (मिर्ची) फ्लेक्स / मिरची पावडर – १/४ चमचा (छोटा)
७. चाट मसाला – भुरभुरण्यासाठी

 

पध्दत :

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. कोबी व गाजर किसून घ्या.
३. एका वाड्ग्या मध्ये घरी बनवलेला कमी कॅलरीजचा थंडगार मेयोनेझ सारखा सॉस काढून घ्या.
४. हा सॉस चांगला फेटून घ्यावा व त्यात किसलेला कोबी व गाजर घालावे.
५. या सॉस मध्ये वर उल्लेखलेल्या सर्व साहित्याचा समावेश करावा (मिश्र हर्ब्स, धणे-जिरे पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स / मिरची पावडर) व मीठ ही घाला.
६. या मिश्रणावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा.
७. हा पदार्थ थंडगारच सर्व्ह करावा :
· एक वाडगाभर, जेवण एक भाग म्हणून किंवा
· कोशिंबीर म्हणून किंवा
· सॅन्डविच/ ओपन सबस / फ्रँकीज मध्ये सारण म्हणून वापरुन टिफिन्स मध्ये ही नेता येते किंवा
· पोळी वा भाकरी बरोबरही खाता येते.

८. आता कोणत्याही अपराधी भावने शिवाय आपल्या आवडत्या लो कॅलरी भाज्यांचे कोलस्लोचा आनंद घ्या.

 

Recipe in English

VEGETABLE COLESLAW

03

Oct
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

LOW-CALORIE VEGETABLE COLESLAW

 

INGREDIENTS:

MAIN INGREDIENTS:
1. Homemade Low-calorie Mayonnaise like sauce – 200 gm
2. Carrot – 2
3. Cabbage -100 gm
4. Salt – As per taste
5. Mix herbs/Coriander-Cumin powder – 1/2 Tea spoon
6. Chili flakes/Chili powder – 1/4th Tea spoon
7. Chaat masala – To sprinkle

 

METHOD:

 1. First soak all the vegetables with their intact skin in Luke-Warm water with added turmeric and salt for 15-20 mins. After 15-20 mins wash them with clean water
 2. Grate Cabbage and Carrot.
 3. Take chilled Homemade Low-calorie Mayonnaise like sauce in a bowl.
 4. Beat it and add grated cabbage & carrot into this.
 5. Add all the spices as mentioned in the ingredients (Mix herbs/Coriander-cumin powder, Chaat masala, Chili flakes/Chili powder) and salt into this mixture.
 6. Just sprinkle little chaat masala over it.
 7. Serve it chilled:
 • One bowl as a part of meal. OR
 • As a Salads. OR 
 • Use it as a stuffing for sandwiches/open subs/frankies which can be taken in tiffins. OR
 • You can eat it with Roti or Bhakri
 1. Enjoy your Favorite Low-calorie Vegetable Coleslaw without any guilt. 

 

Recipe in Marathi

लाल भोपळ्याचे काप

25

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

कमी कॅलोरी चे लाल भोपळ्याचे काप

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. लाल भोपळा – ३०० ग्रॅ
२. मीठ – चवीनुसार
३. संडे मसाला – १/२ चमचा (छोटा)
४. धने-जिरे पावडर – १/२ चमचा (छोटा)
५. तांदूळ पीठ – १ चमचा (छोटा)

 

पध्दत :

१. प्रथम कोमट पाण्यात हळद व मीठ घालून सर्व भाज्या सालासकट, १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. आता लाल भोपळ्याचे पातळ चौकोनी काप करून घ्यावेत.
३. नंतर ही कापं ५ मिनिटं चांगली वाफवून घ्यावीत. मग मीठ, संडे मसाला, धने-जिरे पावडर व तांदळाचे पीठ ह्या मिश्रणामध्ये ही वाफवलेली कापं घोळवून घ्यावीत.
४. आता ही कापं एका नॉन-स्टिक पॅन मध्ये (हॉटप्लेट / स्टोव्ह / गॅस वापरुन), दोन्ही बाजूंनी कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावीत.
५. ही कापं चविष्ट लागतात.
६. इव्हिंग स्नॅक्स (संध्याकाळचा अल्पोपहार) किंवा स्टार्टर (तोंडी लावण्यासाठीचा) म्हणून हा एक चांगला पर्याय असू शकतो.
७. ह्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असल्यामुळे, ह्या पदार्थाचा आस्वाद थोड्या जास्त प्रमाणातही घेता येऊ शकतो.

 

Recipe in English

RED PUMPKIN SLICES

25

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

LOW CALORIE RED PUMPKIN (LAL BHOPLA KAAP) SLICES

 

INGREDIENTS:

MAIN INGREDIENTS:
1. Pumpkin (Lal Bhopla) – 300 gm
2. Salt – as per taste
3. Sundae masala – 1/2 Tea spoon
4. Coriander-cumin (Dhane-Jeere) powder – 1/2 Tea spoon
5. Rice flour – 1 Tea spoon

 

METHOD:

 1. First soak all the vegetables with their intact skin in Luke-Warm water with added turmeric and salt for 15-20 mins. After 15-20 mins wash them with clean water.
 2. Now cut Pumpkin (Lal Bhopla) into thin square shape slices. 
 3. Then steam these slices for 5 min and then add salt, Sundae masala, Coriander cumin powder and rice flour to it .
 4. Now roast these slices on one Non-stick Pan (Using hotplate/stove/gas), from both the sides till they become crispy and golden. 
 5. It tastes good. 
 6. This can be a good option as a Starter or for evening snacks.
 7. It is low in calories so one can enjoy it in a good quantity. 

 

Recipe in Marathi

क्रीम ऑफ पालक सूप

11

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

कमी कॅलरीयुक्त क्रीम ऑफ पालक सूप (क्रिम विरहित)

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. पालक- १ जुडी
२. उकडलेला फ्लॉवर – १०० ग्रॅम
३. कांदा- १ मध्यम आकाराचा
४. लसूण- २ पाकळ्या
५. हिरवी मिरची – १ लहान
६. दूध- १०० मिली
७. मीठ- चवीप्रमाणे
८. ओरेगॅनो/धने-जिरे पूड- १/४ टी स्पून

 

पध्दत :

१. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमटपाण्या मध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. आता १ जुडी पालक नीट चिरून घ्यावा.
३. कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरचीसुद्धा चिरून घ्यावी.
४. नंतर एका कढई मध्ये थोडे पाणी घेऊन ती हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावी.
५. आता ह्या कढई मध्ये चिरलेला पालक ५-७ मिनिटांसाठी उकडून घ्यावा.
६. एक मिक्सरमध्ये चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि उकडलेला फ्लॉवर घ्यावा व त्यामध्ये थोडे मीठ आणि दूध मिक्स करावे.
७. ह्या सर्व गोष्टी मिक्सर मध्ये एकजीव होईपर्यंत नीट वाटून घ्याव्यात.
८. गरज वाटल्यास उरलेले दूध ह्यामध्ये मिक्स करावे (ऐच्छिक).
९. हि फ्लॉवरची एकजीव पेस्ट म्हणजेच आपले क्रीम होय.
१०. उकडलेला पालकसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यावा आणि त्याची एकजीव पेस्ट बनवून घ्यावी.
११. आता एक तवा गरम करावा आणि त्यामध्ये पालकाची पेस्ट घेऊन नीट परतावी.
१२ ह्यामध्ये फ्लॉवरची पेस्ट (आपले क्रिम) मिक्स करावी जेणेंकरू आपल्या सूप ला क्रिमी चव येईल.
१३. क उकडल्यानंतर उरलेले पाणी ह्यामध्ये मिक्स करावे.
१४. ओरेगॅनो/धने-जिरे पूड आणि चवीप्रमाणे मीठ मिक्स करून सर्व मिश्रण पुन्हा एकदा नीट ढवळावे.
१५. तव्यावर झाकण ठेऊन हे ५-७ मिनिटांसाठी नीट उकळू द्यावे.
१६. सूप एकदा नीट उकळले कि ते गरमागरम प्यायला घ्यावे.
१७. हे सूप आपण जेवणापूर्वी घेऊ शकता.
१८. तुमच्या कमी कॅलरीयुक्त गरमागरम क्रिम ऑफ पालक सूप (क्रिमविरहित) चा आस्वाद बिनधास्त लुटा!

 

Recipe in English

CREAM OF PALAK SOUP

11

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

LOW CALORIE CREAM OF PALAK (SPINACH) SOUP (WITHOUT ACTUAL CREAM)

 

INGREDIENTS:

MAIN INGREDIENTS:
1. Palak (Spinach) – 1 bunch
2. Boiled Cauliflower – 100gm
3. Onion – 1 (medium size)
4. Garlic – 2 cloves
5. Green Chili – 1 small
6. Milk – 100 ml
7. Salt – As per taste
8. Oregano/ Coriander Cumin powder- ¼ th Tea spoon

 

METHOD:

  1. First soak all the vegetables with their intact skin in Luke-Warm water with added turmeric and salt for 15-20 mins. After 15-20 mins wash them with clean water.
  2. Then chop roughly 1 bunch of Palak (Spinach). 
  3. Chop the onion, garlic cloves and green chili.
  4. Now heat a kadai (Sauce pan) on Gas/Stove/Hotplate after pouring some water in it. 
  5. Put the chopped palak (Spinach) in it and steam it for 5-7 min. 
  6. In a mixer grinder, add boiled cauliflower, chopped onion, chopped garlic and green chili, little salt and little milk. 
  7. Grind everything to a smooth paste (Cauliflower Puree). 
  8. Add remaining milk if required (optional). 
  9. This cauliflower puree is our CREAM.
  10. Also grind steamed palak in a mixer to make a smooth paste(Palak/spinach Puree)
  11. Heat a pan and add Palak (Spinach) puree to it. Stir it well. 
  12. Add Cauliflower paste to this (Which is our cream).  We get creamy flavor and same taste. 
  13. Add veg stock (Remaining water from boiled palak/Spinach) to this.
  14. Now add salt, oregano/Coriander-Cumin powder and again stir everything well. 
  15. Cover it and let it simmer for 5-7 min. 
  16. Bring it to boil and serve immediately. 
  17. This can be taken as a soup before meal. 
  18. Enjoy your Hot Cream of Palak (Spinach) Soup. Completely without Cream.
  19. Very Low in calorie.

 

Recipe in Marathi

पाव-भाजी

05

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

कमी कॅलरीयुक्त तेलविरहित पाव-भाजी

 

साहित्य:

१. उकडलेले बटाटे: ६ छोटे /५ मध्यम आकाराचे
२. फ्लॉवर: १ माध्यम आकाराचा
३. टोमॅटो: ३
४. कांदे: ४ लहान/३ मध्यम आकाराचे
५. सिमला मिरची: १
६. पाव-भाजी मसाला: १ टेबल स्पून
७. लाल काश्मिरी पावडर: १ टी स्पून
८. चाट मसाला: १/२ टी स्पून
९. मीठ: चवीप्रमाणे
१०. हिरवे वाटण: १ टी स्पून

सजावटीकरिता:
१. कोथिंबीर
२. कांदा: १ बारीक चिरलेला
३. लिंबू: अर्धे

 

 

पद्धत:

१. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. आता टोमॅटो चार भागांमध्ये चिरून घ्यावा.
३. फ्लॉवरच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात.
४. आता कांद्याच्या साली काढून ते सुद्धा चार भागांमध्ये चिरून घ्यावेत.
५. एका मिक्सरमध्ये चिरलेले टोमॅटो आणि कांदे घ्या आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घाला.
६. आता साहित्यात दिल्याप्रमाणे सर्व मसाले: काश्मिरी लाल पावडर, पाव भाजी मसाला, आणि थोडेसे मीठ ह्यामध्ये मिक्स करा.
७. सर्व गोष्टी मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या जेणेकरून त्याची एकजीव पेस्ट तयार होईल (कांदा-टोमॅटो पेस्ट).
८. आता एका हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर एक कुकर गरम करत ठेवावा आणि ह्यामध्ये एक शिट्टी होई पर्यंत फ्लॉवरच्या पाकळ्या उकडून घ्याव्यात.
९. आता एक कढई गरम करावी आणि ह्यामध्ये हिरवे वाटण नीट परतून घ्यावे.
१०. ह्यामध्ये कांदा-टोमॅटो पेस्ट घालून पुनः नीट परतावे.
११. आता ह्या मध्ये सिमला मिरची मिक्स करावी आणि सर्व गोष्टी नीट परताव्यात.
१२. उकडलेले बटाटे आणि फ्लॉवर कुस्करून ह्यामध्ये मिक्स करावे व त्यात चाट मसाला आणि मीठ घालावे.
१३. आता स्मॅशर च्या साहाय्याने सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत नीट स्मॅश करून घ्याव्यात.
१४. आता हि भाजी ५-७ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावी.
१५. नीट शिजल्यावर हि भाजी एका प्लेट/बाउल मध्ये घ्यावी आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सजावटी साठी घालून घ्यावी आणि वरून थोडेसे लिंबू पीळावे.
१६. हि भाजी तुम्ही घरी बनवलेल्या तांदळाच्या/ज्वारीच्या ब्रेड सोबत किंवा तुमच्या आवडीच्या पावासोबात खाऊ शकता.
१७. चला तर ह्या कमी कॅलरीयुक्त तेलविरहित पाव-भाजीचा आस्वाद लुटुयात.

 

Recipe in English

PAV BHAJI

05

Sep
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment

 

LOW CALORIE ZERO OIL PAV BHAJI

Pav Bhaji is popular Indian street food where dinner rolls/buns are served with spicy mashed veggies topped with dollop of butter. But here we are preparing it with zero amount of oil. 

 

INGREDIENTS:

1. Boiled Potato: 6 small/5 med size
2. Cauliflower: 1 medium size
3. Tomato: 3
4. Onion: 4 small/3 medium size
5. Capsicum: 1
6. Pav Bhaji Masala: 1 Table spoon
7. Red Kashmiri powder: 1 Tea spoon
8. Chaat masala: 1/2 Tea spoon
9. Salt: As per taste
10. Green paste: 1 Tea spoon

FOR GARNISHING:
1. Coriander: For garnishing
2. Onion: 1 Finely chopped
3. Lemon: Half

 

 

METHOD:

 1. First soak all the vegetables with their intact skin in Luke-Warm water with added turmeric and salt for 15-20 mins. After 15-20 mins wash them with clean water.
 2. Now cut tomato in 4 parts.
 3. Remove florets from the cauliflower. 
 4. Remove skin of onions and cut them into 4 parts.
 5. In a mixer grinder add these cut tomatoes and onions. 
 6. Also add little water to them. 
 7. Add all the masalas mentioned in the ingredients list: Kashmiri powder, Pav Bhaji masala and little salt. 
 8. Grind everything in the mixer till it becomes smooth like a paste (Tomato Onion Puree). 
 9. On a hotplate/Gas/Stove keep one pressure cooker and cook cauliflower florets until one whistle. 
 10. Now heat one kadai, add green paste to it and saute’ well. 
 11. Add tomato onion puree to it and stir it well. 
 12. Now add capsicum and saute everything well. 
 13. Add boiled-smashed potatoes and smashed cauliflower to it. 
 14. Now add salt and chaat masala. 
 15. Now smash all the vegetables with a smasher to make sure there are no lumps and everything is smooth. 
 16. Cook this for approximately 5-7 min. 
 17. Serve it in a plate/bowl, garnish it with Coriander, chopped onion and sprinkled lemon. 
 18. Serve it hot with homemade Rice/Jowar bread. Or with your favorite Pav. 
 19. Enjoy your hot Low-calorie Zero Oil Pav Bhaji, as much as you want. 

 

Recipe in Marathi

तांदळाचा ब्रेड

28

Aug
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment
Rice Bread, Low Calorie food, oil free food, Healthonics, healthy food, Homemade, Recipe

 

आपण नेहमी जो ब्रेड खातो तो एकतर मैद्याचा बनलेला असतो किंवा गव्हापासून बनलेला असतो. मैद्यापासून बनलेला ब्रेड हा आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये कॅलरीज पण भरपूर प्रमाणात असतात. गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत तांदळाचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो , पण बाजारामध्ये फक्त तांदळाचा ब्रेड सापडणे थोडे कठीणच असते. पण काळजी करू नका, ह्यावर सुद्धा उपाय आहे! तुम्ही तुमच्यासाठी तांदळाचा ब्रेड घरच्याघरीच बनवू शकता आणि तो पण फक्त ओव्हन किंवा साधा प्रेशर कुकर वापरून! पुढे दिलेली रेसिपी तुम्हाला हा तांदळाचा ब्रेड कसा बनवावा ह्यासाठी मार्गदर्शन करेल जेणे करून तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये कुठलीही चिंता न करता ब्रेड चा आस्वाद घेऊ शकाल. हा ब्रेड बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाची आवश्यकता आहे आणि साखरेची तर गरजच नाही, त्यामुळे ह्यात कॅलरीज पण खूपच कमी प्रमाणात आहेत.

 

ग्लूटेन फ्री लो कॅलरी तांदळाचा ब्रेड

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. तांदळाचे पीठ – २५० ग्रॅम.
२. दही – २५० ग्रॅम.
३. दूध – २५० मिली.
४. मीठ – चवीप्रमाणे
५. इनो फ्रुट सॉल्ट – २ टी स्पून्स
६. बेकिंग सोडा – १/२ टी स्पून
७. बेकिंग पावडर – १ टी स्पून

 

पध्दत :

१. प्रथम २५० ग्रॅम दही एका बाऊलमध्ये फेटून घ्यावे.
२. त्यामध्ये आता दूध मिक्स करावे.
३. दूध मिक्स केल्यावर, ह्यामध्ये थोडे थोडे करून तांदळाचे पीठ मिक्स करावे आणि असे करताना सतत ढवळावे जेणेकरून पीठाचे गोळे मिश्रणामध्ये तयार होणार नाहीत.
४. हे एकजीव होई पर्यंत नीट ढवळावे.
५. आता ह्यामध्ये मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि इन-फ्रुट सॉल्ट घालावे.
६. आता हे मिश्रण पुन्हा नीट फेटून घ्यावे.
७. मिश्रण आंबले कि ते हलके होते, आणि ते फुलून येते.
८. आता एका आयताकृती साच्याला आतल्या बाजूने १ थेंब तेल ब्रशने नीट लावून घ्यावे, आणि थोडेसे तांदळाचे पीठ आतल्या भागाला सर्वबाजूने लावावे.
९. आता हे मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यावे.
१०. आता ओव्हन गरम होऊ द्यावा आणि साच्यात भरलेले मिश्रण २५० अंश सेल्सिअस तापमानावर एक ते दिड तासांपर्यंत नीट भाजून घ्यावे

किंवा

१. एक कुकर गरम करत ठेवावा.
२. कुकर गरम करत ठेवायच्या अगोदर त्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्यावी.
३. आत कुकर मध्ये एक स्टॅन्ड ठेवून ५-८ मिनिटांसाठी गरम करून घ्यावा.
४. आता वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे मिश्रण बनवून आयताकृती साच्यामध्ये भरून घ्यावे आणि तो साचा कुकर मध्ये ठेवावा. आता हे मिश्रण कुकरमध्ये १ तासासाठी नीट भाजून घ्यावे.
५. ब्रेड तयार झाला कि नाही हे तपासण्यासाठी एक टूथपीक घ्यावी आणि ब्रेड च्या मध्ये खुपसावी.
६. जर ती होती तशी बाहेर आली तर समजावे कि ब्रेड तयार झाला आहे.
७. आत हा ब्रेड साच्यामध्येच १५-२० मिनटे थंड होऊ द्यावा.
८. आता एक सूरी घेऊन ती साच्याच्या चारी बाजूने फिरवून घ्यावी आणि साचा एका प्लेटमध्ये उपडा करावा जेणेकरून ब्रेड मोकळा होईल.
९. आता तुमचा तांदळाचा ब्रेड तयार झाला आहे.

ह्या तांदळाचा ब्रेडचा उपयोग डब्यात देण्याजोग्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी करू शकता जसे:
१. सँडविचेस (सलाड आणि आवडत्या सॉस बरोबर).
२. गार्लिक ब्रेड (ब्रेड वर लसणाची पेस्ट आणि थोडे मीठ, हर्ब्स घालून).
३. चहा/कॉफी बरोबर कुरकुरीत टोस्ट म्हणून.
४. हा ब्रेड तुम्ही पाव भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता.

कोणत्याही टेन्शनशिवाय तुम्ही ह्या ग्लूटेन फ्री लो कॅलरी तांदळाच्या ब्रेड चा आस्वाद घेऊ शकता

 

Recipe in English

RICE BREAD

28

Aug
2018
Posted By : Healthonics Healthcare 0 Comment
Rice Bread, Low Calorie food, oil free food, Healthonics, healthy food, Homemade, Recipe

 

The bread which we we eat routinely is either made up of Maida (Bleached flour) or whole wheat. If it is made up of Maida it is definitely harmful for health also it contains a lot of calories. The whole wheat bread may not be that harmful for health but it still has high calories, so not suitable for those who want to lose weight. There is also risk of gluten (compound present in wheat) intolerance for those who are sensitive to it. Rice bread can be an option in this situation but finding a Rice bread in market is bit difficult. But don’t worry, here is the solution!  You can make your Rice bread at home and that too using just an oven or a pressure cooker, Amazing! Yes, it is possible. Follow the given recipe on how to make a Rice bread and enjoy your breakfast without any guilt. It requires just 1-2 drops of oil and no sugar in making of this bread, which makes it very low in calories.

 

GLUTEN-FREE LOW-CALORIE RICE BREAD

 

INGREDIENTS:

MAIN INGREDIENTS:
1. Rice Flour: 250 gm
2. Curd: 250 ml
3. Milk: 250 ml
4. Salt: As per taste
5. Eno fruit salt: 2 Tea spoons
6. Baking soda: 1/2 Tea spoon
7. Baking powder: 1 Tea spoon

 

METHOD:

 1. Beat 250 ml. of curd in a bowl.
 2. Now add milk to this.
 3. After milk; add Rice flour slowly into it till there are no lumps left.
 4. Stir it to make a smooth batter. 
 5. Add Salt, baking powder, baking soda and Eno-fruit salt to it.
 6. Whisk the batter.
 7. It ferments and become light in weight. This batter should be little flowy in consistency, so it rises up. 
 8. Greasea rectangular mold with one drop of oil and pat it inside with some rice flour.
 9. Now preheat oven.
 10. Bake it in this oven on 250 Degree-Celsius for almost 1 to 1 n 1/2 hr. 

OR

 1. Preheat a Cooker. 
 2. Remove whistle and ring before preheating a cooker. 
 3. Now just place one stand in this cooker and heat it for 5-8 min. 
 4. Now same follow the same procedure as mentioned above procedure and place the vessel containing batter in this cooker. 
 5. Now bake it for 1 hour. 
 6. To check whether Bread is ready or not, pierce one toothpick in it. 
 7. If it comes out clean from all sides; means bread is ready. 
 8. Now let it cool for 15-20 minutes. 
 9. Then move one knife at all the edges and just flip the mold on any tray. 
 10. Rice bread is ready. 

 

This can be useful for Tiffin as:

 1. Sandwiches (with salad and favorite sauce)
 2. Garlic Bread (Put salt and garlic paste with herbs).
 3. Even as a Crispy Toast to enjoy with Tea/Coffee.
 4. It can also be eaten with Paav Bhaji.

Enjoy your Gluten-Free Low-Calorie Rice bread without any guilt. 

 

Recipe in Marathi