10 Jul 2018

चिकन सीख कबाब

 

कमी कॅलरीयुक्त चिकन सीख कबाब

 

साहित्य:

१. हळद पूड- १/४ टी स्पून
२. संडे मसाला- १/२ टी स्पून
किंवा
मिरची पूड- १/४ टी स्पून
३. धने-जिरे पूड – १/२ टी स्पून
४. मीठ- चवीप्रमाणे
५. हिरवे वाटण – १/२ टी स्पून
६. चाट मसाला – १/२ टी स्पून
७. तीळ – १/२ टी स्पून
८. तेल- फक्त ब्रशिंगसाठी
९. तांदळाचे पीठ – ३ टेबल स्पून
१०. कांदे – २
११. चिकन खिमा (ब्रेस्ट ) – २५० ग्रॅम
१२. मिक्स भाज्या – तुमच्या आवडीप्रमाणे – २५० ग्रॅम

ह्या पाककृतीच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेल्या भाज्या:
१. कोबी – ५० ग्रॅम
२. गाजर – ५० ग्रॅम
३. लाल भोपळा – ५० ग्रॅम
४. दुधी – ५० ग्रॅम
५. उकडलेले बटाटे – २ (५० ग्रॅम)

  •  चिकन आणि भाज्यांचे प्रमाण हे समान असावे जेणेकरून कॅलरीज कमी होण्यास मदत होते

 

 

पद्धत:

१. सर्वप्रथम साहित्यामध्ये दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट, हळद आणि मीठ मिक्स केलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात. १५-२० मिनिटे झाल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात.
२. आता ह्या सर्व भाज्या नीट किसून घ्याव्यात.
३. दोन कांदे बारीक चिरून घ्यावेत.
४. आता ह्या किसलेल्या भाज्या ८-१० मिनिटांसाठी वाफवून घ्याव्या.
५. आता चिकन खिमा (ब्रेस्ट) साफ करून घ्यावा.
६. खिमा (चिकन) मीठ आणि हळद लावून मॅरीनेट करावा.
७. आता एक प्रेशर पॅन हॉटप्लेट/स्टोव्ह/गॅस वर गरम करत ठेवावा आणि चिरलेला कांदा त्यामध्ये घालून परतून घ्यावा.
८. कांद्यामध्ये थोडे मीठ घालावे जेणेकरून तो नरम होण्यास मदत होते.
९. आता हा कांदा २ मिनिटांसाठी नीट परतून घ्यावा (गुलाबी रंग येई पर्यंत).
१०. आता ह्या कांद्यामध्ये मॅरीनेट केलेला चिकन खिमा मिक्स करावा आणि नीट परतून घ्यावा.
११. हे मिश्रण नरम झाले कि त्याला पाणी सुटते.
१२. आता ह्या मिश्रणासहित प्रेशर पॅन ची एक शिट्टी होऊ द्या आणि मग ते थंड होण्यासाठी ठेऊन द्या.
१३. झाकण उघडले कि मग हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्या.
१४. आता एक कढई हॉटप्लेट/स्टोव्ह/गॅस वर गरम करत ठेवा आणि तिला ब्रशच्या साहाय्याने एक थेंब तेल नीट लावून घ्या.
१५. कढई मध्ये तीळ, हळद आणि शिजवलेला चिकन खिमा घालावा.
१६. आता ह्यामध्ये वाफवलेल्या भाज्या मिक्स करून सर्व मिश्रण नीट परतून घ्या.
१७. आता ह्या मिश्रणात संडे मसाला/तिखट पूड, धने-जिरे पूड, मीठ, हिरवे वाटण, चाट मसाला आणि उकडलेले बटाटे कुस्करून घाला आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा नीट परतून घ्या.
१८. आता एका दुसऱ्या कढईमध्ये तांदळाचे पीठ २ मिनिटांसाठी नीट भाजून घ्या.
१९. आता हे भाजलेले तांदळाचे पीठ मिश्रणामध्ये मिक्स करून सर्व गोष्टी नीट परतून घ्या.
२०. आता हे मिश्रण एकजीव करून घ्या, नंतर त्यावर झाकण ठेऊन ३-५ मिनिटांसाठी ते नीट शिजू द्या.
२१. नीट शिजल्यावर ते एका परातीमध्ये थंड होण्यासाठी नीट पसरून ठेवा.
२२. आता हाताच्या तळव्याला एक थेंब तेल लावून घ्या आणि ह्या मिश्रणापासून लांबट आकाराचे कबाब बनवून घ्या, आणि दुसऱ्या ताटलीमध्ये ठेवून द्या.
२३. एक तवा गरम करत ठेवा, तो गरम झाला कि त्याला एक थेंब तेल ब्रशने नीट लावून घ्या आणि हे कबाब मध्यम आचेवर नीट भाजून घ्या. भाजताना ते दोन्ही बाजूने नीट खरपूस होईपर्यंत भाजावेत.

किंवा

२४. तुम्ही हे कबाब एअर फ्रायर मध्ये १८० अंश तापमानावर १० मिनिटांसाठी भाजू शकता.
२५. ह्या गरमागरम चिकन सीख कबाब चा आनंद चटणी किंवा सॉस बरोबर लुटावा.

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/chicken-seekh-kabab-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply