Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

लाल बहार सूप

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. टोमॅटो - ३ नग २. फ्लावर - १०० ग्रॅम ३. गाजर - १ नग ४. मीठ - चवीनुसार ५. डेक्सट्रोज - १ छोटा चमचा (ऐच्छिक) ६. धणे-जिरे पूड - १ छोटा चमचा ७. दूध - १२० मि.ली./ अर्धा कप ८. पाणी - अर्धा ग्लास

 

पध्दत :

१. प्रथम, सर्वसाधारणपणे सर्व भाज्या चिरून घ्याव्यात (टॉमेटो, गाजर आणि  फ्लावर).

२. उपलब्धतेनुसार, गॅस/स्टोव्ह/हॉट प्लेटवर प्रेशर कूकर गरम करत ठेववा व त्यात या चिरलेल्या भाज्या घालाव्यात (टॉमेटो, गाजर आणि  फ्लावर).

३. हे सर्व २ मिनिटे नीट परतून घ्यावे.

४. आता या मिश्रणात अर्धा ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे.

५. कूकरची एक शीटी होऊ द्यावी.

६.  एक शीटी झाल्यावर गॅस/स्टोव्ह/हॉट प्लेट बंद करावा व कूकर थंड होऊ द्यावा.

७. भाज्यांचे हे शिजलेले मिश्रण, धणे-जिरे पूड, दूध व डेक्सट्रोज मिक्सर मधून काढून घ्यावे. हे मिश्रण गुठळ्या विरहित असावे.

८. आता एका भांड्यात हे मिश्रण गरम करावे. आवश्यक्ता असल्यास त्यात थोडे पाणी घालावे.

९. हे मिश्रण उकळू द्यावे व किमान १० मिनीटे खतखतू द्यावे.

१०. हे मित भोजन/क्षुधावर्धक म्हणून गरम गरम वाढावे.

११. या कमी-कॅलेरी लाल बहार सूपचा आस्वाद घ्यावा.

 

English