Rice Bread, Low Calorie food, oil free food, Healthonics, healthy food, Homemade, Recipe
28 Aug 2018

तांदळाचा ब्रेड

 

आपण नेहमी जो ब्रेड खातो तो एकतर मैद्याचा बनलेला असतो किंवा गव्हापासून बनलेला असतो. मैद्यापासून बनलेला ब्रेड हा आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये कॅलरीज पण भरपूर प्रमाणात असतात. गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत तांदळाचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो , पण बाजारामध्ये फक्त तांदळाचा ब्रेड सापडणे थोडे कठीणच असते. पण काळजी करू नका, ह्यावर सुद्धा उपाय आहे! तुम्ही तुमच्यासाठी तांदळाचा ब्रेड घरच्याघरीच बनवू शकता आणि तो पण फक्त ओव्हन किंवा साधा प्रेशर कुकर वापरून! पुढे दिलेली रेसिपी तुम्हाला हा तांदळाचा ब्रेड कसा बनवावा ह्यासाठी मार्गदर्शन करेल जेणे करून तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये कुठलीही चिंता न करता ब्रेड चा आस्वाद घेऊ शकाल. हा ब्रेड बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाची आवश्यकता आहे आणि साखरेची तर गरजच नाही, त्यामुळे ह्यात कॅलरीज पण खूपच कमी प्रमाणात आहेत.

 

ग्लूटेन फ्री लो कॅलरी तांदळाचा ब्रेड

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. तांदळाचे पीठ – २५० ग्रॅम.
२. दही – २५० ग्रॅम.
३. दूध – २५० मिली.
४. मीठ – चवीप्रमाणे
५. इनो फ्रुट सॉल्ट – २ टी स्पून्स
६. बेकिंग सोडा – १/२ टी स्पून
७. बेकिंग पावडर – १ टी स्पून

 

पध्दत :

१. प्रथम २५० ग्रॅम दही एका बाऊलमध्ये फेटून घ्यावे.
२. त्यामध्ये आता दूध मिक्स करावे.
३. दूध मिक्स केल्यावर, ह्यामध्ये थोडे थोडे करून तांदळाचे पीठ मिक्स करावे आणि असे करताना सतत ढवळावे जेणेकरून पीठाचे गोळे मिश्रणामध्ये तयार होणार नाहीत.
४. हे एकजीव होई पर्यंत नीट ढवळावे.
५. आता ह्यामध्ये मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि इन-फ्रुट सॉल्ट घालावे.
६. आता हे मिश्रण पुन्हा नीट फेटून घ्यावे.
७. मिश्रण आंबले कि ते हलके होते, आणि ते फुलून येते.
८. आता एका आयताकृती साच्याला आतल्या बाजूने १ थेंब तेल ब्रशने नीट लावून घ्यावे, आणि थोडेसे तांदळाचे पीठ आतल्या भागाला सर्वबाजूने लावावे.
९. आता हे मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यावे.
१०. आता ओव्हन गरम होऊ द्यावा आणि साच्यात भरलेले मिश्रण २५० अंश सेल्सिअस तापमानावर एक ते दिड तासांपर्यंत नीट भाजून घ्यावे

किंवा

१. एक कुकर गरम करत ठेवावा.
२. कुकर गरम करत ठेवायच्या अगोदर त्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्यावी.
३. आत कुकर मध्ये एक स्टॅन्ड ठेवून ५-८ मिनिटांसाठी गरम करून घ्यावा.
४. आता वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे मिश्रण बनवून आयताकृती साच्यामध्ये भरून घ्यावे आणि तो साचा कुकर मध्ये ठेवावा. आता हे मिश्रण कुकरमध्ये १ तासासाठी नीट भाजून घ्यावे.
५. ब्रेड तयार झाला कि नाही हे तपासण्यासाठी एक टूथपीक घ्यावी आणि ब्रेड च्या मध्ये खुपसावी.
६. जर ती होती तशी बाहेर आली तर समजावे कि ब्रेड तयार झाला आहे.
७. आत हा ब्रेड साच्यामध्येच १५-२० मिनटे थंड होऊ द्यावा.
८. आता एक सूरी घेऊन ती साच्याच्या चारी बाजूने फिरवून घ्यावी आणि साचा एका प्लेटमध्ये उपडा करावा जेणेकरून ब्रेड मोकळा होईल.
९. आता तुमचा तांदळाचा ब्रेड तयार झाला आहे.

ह्या तांदळाचा ब्रेडचा उपयोग डब्यात देण्याजोग्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी करू शकता जसे:
१. सँडविचेस (सलाड आणि आवडत्या सॉस बरोबर).
२. गार्लिक ब्रेड (ब्रेड वर लसणाची पेस्ट आणि थोडे मीठ, हर्ब्स घालून).
३. चहा/कॉफी बरोबर कुरकुरीत टोस्ट म्हणून.
४. हा ब्रेड तुम्ही पाव भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता.

कोणत्याही टेन्शनशिवाय तुम्ही ह्या ग्लूटेन फ्री लो कॅलरी तांदळाच्या ब्रेड चा आस्वाद घेऊ शकता

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/rice-bread-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply