Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

कमी कॅलरीजचे तांद्ळाचे पिठले

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. तांदळाचे पीठ - १ वाटी / १०० ग्रॅम २. हळद - १/२ चमचा ३. धणे-जिरे पावडर -  १/२ चमचा ४. कांदा - २ नग ५. मीठ - चवीनुसार ६. डेक्सट्रोज साखर - १/२ चमचा ७. कोथिंबीर - सजावटीसाठी

लज्ज्तदार बनविण्यासाठी / विशेष स्वाद आणण्यासाठी: १. मोहरी - १/४ चमचा २. जिरे - १/४ चमचा ३. हिरवी मिरची - १ नग ४. लसूण - २ पाकळ्या ५. कढीपत्ता  - ५ ते ६ पाने

 

पध्दत :

१. एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या व त्यात मीठ, डेक्सट्रोज साखर, धणे-जिरे पावडर आणि हळद घाला.

२. ह्या मिश्रणात हळूहळू, गुठळ्या न होऊ देता, पाणी घालत पेस्ट होईपर्यंत ढवळावे.

३. आता हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर एक पातेले गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची व ठेचलेली लसूण घालावी. हे सर्व १ मिनीट आचेवर परतावे.

४. आता ह्यात चिरलेला कांदा घालावा व थोड्याप्रमाणात मीठ घालावे जेणेकरुन कांदा लवकर मऊ होईल.

५. कांदा गुलाबी होताच त्यात तांदळाच्या पिठाचे मिश्रण घालावे.

६. हे मिश्रण नीट ढवळत राहावे व भांड्याला लागू न देण्याची काळजी घ्यावी.

७. मंद आचेवर ठेवावे.

८. आता ह्यावर झाकण ठेवून शिजवावे.

९. साधारण ५ मिनिटांनी ढवळावे.

१०. साधारण १० मिनिटांनी झाकण बाजूला काढून ठेवावे व कोथिंबीर घालावी.

११. आता पिठले वाढण्यासाठी तयार झाले आहे.

१२. हे तांदळाचे गरमागरम पिठले भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर वाढावे.

१३. ह्या स्वादिष्ट, आरोग्याला पोषक व पूर्णपणे कमी-कॅलरीजच्या जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता.

 

English