Seekh kebab
04 Jul 2018

व्हेजिटेबल सीक कबाब

 

व्हेजिटेबल सीक कबाब

 

साहित्य:

1. मिक्स भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे किंवा
2. कोबी – १०० ग्रॅम
3. गाजर – १०० ग्रॅम
4. लाल भोपळा – १५० ग्रॅम
5. दुधी भोपळा – १०० ग्रॅम
6. उकडलेले बटाटे – २
7. तांदळाचे पीठ – ३ टेबल स्पून
8. संडे मसाला – १ टी स्पून
9. धने-जीरे पावडर – १ टी स्पून
10. हिरवे वाटण – १ टी स्पून
11. मीठ – चवीप्रमाणे
12. तेल- ब्रशिंगसाठी

फोडणी करीता:
1. पांढरे तीळ – १ टी स्पून
2. मोहरी – १ टी स्पून
3. हळद पूड – १/२ टी स्पून
4. स्टिक्स – सिक कबाब साठी (बाजारात सहजपणे उपलब्ध असतात)

 

पद्धत:

1. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमट
पाण्या मध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ
पाण्याने धुवून घ्याव्यात.
2. नंतर ह्या सर्व भाज्या उकडून घ्याव्यात.
3. आता एक कढई हॉटप्लेट/स्टोव्ह/गॅस वर गरम करत ठेवावी आणि त्यामध्ये तांदळाचे पीठ
नीट भाजून घ्यावे
4. आता एक तवा घ्यावा, तो हॉटप्लेट/स्टोव्ह/गॅस वर गरम करावा आणि त्याला ब्रशने साधारण
एक थेंबभर तेल नीट लावून घ्यावे.
5. ह्या तव्यावर मोहरी, पांढर तीळ आणि हळद पूड घालून १ मिनिटासाठी नीट परतून घ्यावे.
6. आता ह्यामध्ये उकडलेल्या मिक्स भाज्या, हिरवे वाटण, धने-जिरे पूड, संडे मसाला आणि मीठ
मिक्स करून २ मिनिटांसाठी नीट परतावे.
7. आता ह्यात उकडलेला बटाटा मिक्स करावा आणि हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.

8. सर्वात शेवटी ह्यामध्ये भाजलेले तांदळाचे पीठ मिक्स करावे आणि पुन्हा ५ मिनिटांसाठी हे
मिश्रण नीट परतून घ्यावे.
9. आता मिश्रणावर झाकण ठेवून ते ३-५ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावे.
10. नंतर ते एका ताटामध्ये नीट पसरून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे.
11. आता हाताच्या तळव्याला एक थेंब तेल लावून घ्यावे आणि मिश्रणापासून लांबट आकाराचे
कबाब बनवून घ्यावेत.
12. मग ते स्टिक ला सिक कबाब साठी आपण लावतो तसे लावून घ्यावेत.
13. आता ते स्टिक सकट तव्यावर भाजून घ्यावेत.(तव्यावर असेच भाजले तरी चालतील किंवा
आवश्यकतेनुसार तव्याला एक थेंब तेल लावून भाजावेत).
14. ते दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत नीट भाजावेत.
15. भाजून झाल्यावर ते स्टिक पासून वेगळे काढून घ्यावेत.
16. सजावटीसाठी ह्यावर चाट मसाला आणि कोथिंबीर घालून घ्यावी. ह्या सोबत हवं असल्यास
काकडी, टोमॅटो आणि कांद्याच्या चकत्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
17. ह्या गरमागरम कबाबांची मजा आपल्या आवडत्या चटणी किंवा सॉस सोबत लुटावी.

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/vegetable-seekh-kabab-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply