22 Oct 2019

फ्लावरची भाजी

 

तेलविरहित फ्लावरची भाजी

 

साहित्य:

१. फ्लावर (वाफवलेला) – १ किलो
२. बटाटा (उकडलेला) – १
३. टोमॅटो (बारीक चिरूलेला) – १
४. कांदा (बारीक चिरूलेला) – २
५. जिरे – १/४ छोटा चमचा
६. मोहरी – १/४ छोटा चमचा
७. हळद – १/४ छोटा चमचा
८. संडे मसाला – १ छोटा चमचा
९. मीठ – चवीनुसार
१०. धणे-जिरे पूड – १/२ छोटा चमचा
११. कोथिंबीर – सजावटीसाठी

 

पद्धत:

१. निवड व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर कढई गरम करावी.
२. या गरम झालेल्या कढईत, जिरे घालावे व १० सेकंद परतावे.
३. नंतर त्यात मोहरी घालून १० सेकंद परतावे.
४. या मिश्रणात हळद घालून सर्व लगेच परतावे.
५. कांदा, मीठ व बारीक चिरलेले टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर हे सर्व परतावे व झाकून ठेवावे.
६. या मिश्रणात उकडलेला बटाटा घालून २-३ मिनिटे नीट परतावे.
७. आता या मिश्रणात वाफवलेला फ्लावर घालावा व पुन्हा नीट परतावे. नंतर त्यात चवीनुसार मसाला व मीठ घालावे.
८. आता सर्व नीट ढवळून घ्यावे आणि सर्वकाही व्यवस्थित मिसळ्यावर कढई २० सेकंद झाकून ठेवावी.
९. साधारण २० सेकंदांनंतर भाजीत कोथिंबीर घालावी.
१०. या तेलविरहित फ्लावरच्या भाजीला पोळी / भाकरी / भाताबरोबर वाढावे.
११. आरोग्यदायी, पौष्टिक, चविष्ट व कॅलरीज ही कमी असलेली ही भाजी,
टिफिनसाठीदेखील एक चांगला पर्याय ठरु शकते !

 

English

Leave a Reply