batata wada
13 Mar 2019

कमी कॅलरीजचा बटाटा वडा

 

कमी कॅलरीजचा बटाटा वडा 

 

साहित्य :

१. तांदळाचे पीठ – ४ टेबलस्पून (मोठा चमचा)
२. उकडलेले बटाटे – ४
३. हिरवी पेस्ट – १ टेबलस्पून (मोठा चमचा)
४. मोहरी – १/४ टीस्पून (छोटा चमचा)
५. जिरे – १/४ टीस्पून (छोटा चमचा)
६. काळी-उडीद डाळ – १/४ टीस्पून (छोटा चमचा)
७. हळद – १/२ टीस्पून (छोटा चमचा)
८. मीठ – चवीनुसार
९. कोथिंबीर – सजावटीसाठी
१०. तेल – फक्त भांड्याला आतून लावून घेण्यापुरते (एक थेंब)

 

 

कृती:

१. ४ उकडलेले बटाटे घेऊन ते चांगले कुस्करावे.
२. आता फोडणीसाठी वापरण्यात येणारे एक भांडे गरम करून घ्यावे व त्यात जीरे,
मोहरी, व काळी-उडीद डाळ घालावी.
३. भांड्यातून तड-तड असा आवाज येऊ लागला वा भांड्यातील जिन्न्स उडु लागले की
त्यात हिरवी पेस्ट व हळद घालावी. हे सर्व १० सेकंदांसाठी परतून / भाजून घ्यावे.
४. हे सर्व मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये घालावे.
५. त्यात मीठ व कोथिंबीर ही घालावी.
६. हे सर्व व्यवस्थीत मिसळावे व त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत.
७. एका वाड्ग्यात तांद्ळाचे पीठ घ्यावे, त्यात थोडे मीठ, हळद व पाणी घालावे. हे सर्व
मिश्रण एकही गुठळी न उरेपर्यंत नीट हलवावे / फेटावे.
८. आता हे छोटे छोटे गोळे ह्या पिठात नीट घोळवावेत जेणेकरुन त्यांच्यावर पीठाचा थर
व्यवस्थित चढेल.
९. आता एक आप्पे पात्र गरम करावे व त्याला आतून एक थेंब तेल लावून घ्यावे.
१०. आता हे पिठात घोळवलेले कच्चे गोळे या आप्पे पात्रात ठेवावेत व झाकणाने झाकून
घ्यावेत.
११. हे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत सर्व बाजूंनी नीट भाजून घ्यावेत.
१२. त्यांना सर्व बाजूंनी योग्य प्रकारे शिजवून घ्यावेत.
१३. आपल्या आवडत्या सॉस किंवा चटणीबरोबर हे गरम गरम वाढावेत.
१४. कमी-कॅलरीजच्या आपल्या आवडत्या बटाटावाड्याचा स्वादिष्ट रेसिपीचा आस्वाद
जरुर घ्या.

 

English

Leave a Reply