20 Dec 2019

मूगडाळीचे पनियारम

 

कमी कॅलरीजचे मूगडाळीचे पनियारम

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. मूग डाळ (पिवळी) – १५० ग्रॅ
२. मीठ – चवीनुसार
३. डेक्स्ट्रोज – १/२ छोटा चमचा (इच्छेनुसार)
४. हिरवी मिरची – १/२
५. आलं – १/४ तुकडा
६. कोथिंबीर – १/२ छोटा चमचा

लज्ज्तदार बनविण्यासाठी / विशेष स्वाद आणण्यासाठी:
१. हळद – १/४ छोटा चमचा
२. जिरे – १/४ छोटा चमचा
३. मोहरी – १/४ छोटा चमचा
४. हिंग – एक चिमूटभर
५. तेल – थोडेसे (ब्रशने भांड्याला आतुन हलकेसे लावण्यापुरते)

 

पध्दत :

१. पिवळी मूगडाळ स्वच्छ धुऊन १ तास पाण्यात भिजत ठेवावी.

२. साधारण एका तासानंतर पाणी निथळून घ्यावे.

३. ही भिजवलेली मूगडाळ, हिरवी मिरची व आले मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.

४. हे मिश्रण जाडसरच वाटून घ्यावे (बारीक पीठ करु नये).

५. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात मीठ, डेक्स्ट्रोज, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

६. सर्व नीट ढवळावे.

७. फोडणी घालायच्या भांड्यात हळद, मोहरी, जिरे व हिंग घालावे.

८. मोहरी तडतडू लागल्यावर वाटलेले मिश्रण त्यात घालावे व आवश्यकता वाटल्यास त्यात थोडे पाणी घालावे.

९. आता सर्व पुन्हा व्यवस्थीत ढवळून घ्यावे.

१०. अप्पेपात्राच्या प्रत्येक खोलगट खाचेस एक थेंब तेल ब्रशने लावावे व त्यात अर्धा चमचा वरील मिश्रण घालावे. साधारणपणे १-२ मिनिटे झाकून ठेवावे.

११. त्यानंतर, खालची बाजू वर परतून घ्यावी व कुरकुरीत तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजू द्यावे.

१२. आता हे गरमागरम मुगडाळ पनियारम थंड दही/घरगुती सॉस/चटणी सोबत वाढावे.

१३. हा अल्पोपाहारासाठी, नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.

१४. या कमी कॅलरीजच्या तरीही चविष्ट, आरोग्यादायी व पौष्टिक मूगडाळ पनियारमचा आस्वाद जरुर घ्या !

 

English

Leave a Reply