कॉलीफ्लॉवर (फ्लॉवर/फुलकोबी) चे सूप

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. फ्लॉवर/फुलकोबी – २५० ग्रॅम
२. कांदा – १
३. लसूण- २ पाकळ्या
४. हिरवी मिरची – १ (तिखट जास्त असल्यास कमी वापरली तरी चालेल)
५. दूध- १५० मिली
६. मीठ- चवीप्रमाणे

 

पध्दत :

१. प्रथम फ्लॉवर/फुलकोबी हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवावा. १५-२० मिनिटे झाल्यानंतर कोमट पाणी गाळून घ्यावे आणि फ्लॉवर स्वच्छ पाण्याने नीट धुवून साफ करून घ्यावा.
२. आता ह्या फ्लॉवरच्या बारीक बारीक पाकळ्या काढून घ्याव्यात.
३. आता ह्या पाकळ्या नीट वाफवून घ्याव्यात आणि एक कांदा बारीक चिरून घ्यावा.
४. नंतर एक प्रेशर कुकर हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा आणि त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घालावा आणि सर्व गोष्टी नीट परतून घ्याव्यात.
५. ह्यामध्ये चवीप्रमाणे थोडे मीठ मिक्स करावे.
६. आता ह्यामध्ये फ्लॉवर चे तुकडे घालून सर्व नीट परतून घ्यावे.
७. नंतर दूध मिक्स करावे आणि पुन्हा सर्व परतावे.
८. हे मिश्रण कुकरची एक शिट्टी होईपर्यंत शिजू द्यावे.
९. नंतर कुकरचे झाकण काढावे आणि हे नीट थंड होऊ द्यावे.
१०. आता हे सर्व मिश्रण एका मिक्सर मध्ये एकजीव होईपर्यंत नीट वाटून घ्यावे. वाटताना गरज वाटल्यास ह्यामध्ये दूध मिक्स करावे जेणेकरून ते मऊसूत आणि एकजीव होईल.
११. आता एक तवा हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा आणि त्यामध्ये हे मिश्रण घ्यावे आणि नीट ढवळावे, ढवळताना ह्यात उरलेले पाणी मिक्स करावे.
१२. नंतर चवीसाठी थोडेसे मीठ मिक्स करावे.
१३. आता हे मिश्रण उकळू द्यावे, उकळत असताना ते नीट ढवळावे आणि एका बाउल मध्ये गरमागरम प्यायला घ्यावे.
१४. अश्याप्रकारे झटपट बनणाऱ्या आणि पौष्टिक असणाऱ्या कॉलीफ्लॉवर (फ्लॉवरच्या) सूप चा आस्वाद तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मनमोकळेपणाने लुटू शकता.

 

Recipe in English