Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

कांदा - ज्वारी डोसा

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. ज्वारीचे पीठ : १ कप २. कांदा : १ (बारीक चिरून) ३. हिरव्या मिरच्या : १ (बारीक चिरून) ४. कोथिंबीर : १/२ वाटी ५. पाणी : आवश्यकतेनुसार ६. मीठ: चवीनुसार

 

पध्दत :

१. एका वाडग्यात ज्वारीचे पीठ घ्यावे, त्यात मीठ घालावे व हळूहळू पाणी घालावे.

२. मिश्रणात गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहावे.

३. आता या मिश्रणात चिरलेली हिरवी मिरची, कांदा व कोथिंबीर घालावी.

४. मिश्रण एकजीव असावे. त्यात गुठळ्या असू नयेत. हे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळही असू नये.

५. उपलब्धता व निवडीनुसार हॉटप्लेट / स्टोव्ह किंवा गॅस बर्नरवर तवा तापवावा.

६. तेलाचा एक थेंब तव्यावर पसरून घ्यावा / अगदी थोडेसे तेल तव्यावर नीट पसरुन घ्यावे.

७. तवा गरम झाला की त्यावर एक डाव मिश्रण नीट पसरून घ्यावे.

८. त्यावर ३० सेकंदांसाठी झाकण ठेवावे.

९. जर दोन्ही बाजूंनी हा डोसा भाजून हवा असेल, तर तो आता परतावा किंवा एकाच बाजूने भाजलेला डोसा ही खाऊ शकता.

१०. आपल्या आवडत्या चटणी / सॉस / भाजीसोबत हा डोसा लगेच वाढावा.

नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी हा एक परिपूर्ण / उत्तम पर्याय असू शकतो. आपल्या ह्या कमी-कॅलरीज ज्वारी डोश्याचा पूरेपूर आनंद घ्या.

 

English