Sun Jun 11 2023
दही पॅटीस चाट
साहित्य
• मुख्यसाहित्य: १. गाजर- १ २. लाल भोपळा- १०० ग्रॅम ३. कोबी- १०० ग्रॅम ४. दुधी भोपळा- १०० ग्रॅम ५. उकडलेले बटाटे- २
• मसाले : १. पाव-भाजी मसाला- १/२ टी स्पून २. आमचूर पावडर - १/४ टी स्पून ३. हिरवे वाटण- १/४ टी स्पून ४. धन-जीरा पूड - १/४ टी स्पून ५. चाट मसाला- १/२ टी स्पून ६. पांढरे तीळ- १ टी स्पून ७. मीठ- चवीप्रमाणे ८. तेल- ब्रशिंग साठी
• सजावटीकरिता: १. दही- ३ टेबल स्पून २. उकडलेला बटाटा- १ ३. कोथिंबीर- १ टी स्पून ४. चाट मसाला- १/२ टी स्पून ५. चटणी - तुमच्या आवडी प्रमाणे ६. हिरवी चटणी - १/२ टी स्पून ७. घरगुती आंबटगोड चिंचेची चटणी- १ टी स्पून ८. घरगुती लाल चटणी - १/२ टी स्पून
१. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमटपाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २. आता ह्या भाज्या नेहमी प्रमाणे चिरून घ्याव्यात किंवा, फूड प्रोसेसरचा वापर करून बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्याव्यात. ३. चिरून झाल्यावर ह्या भाज्या एका बाउलमध्ये घ्याव्यात. ४. त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून मिक्स करून घ्यावेत. ५. आता ह्यामध्ये सर्व मसाले (आमचूर पावडर, पाव-भाजी मसाला, हिरवे वाटण, धना-जीरा पूड, मीठ आणि चाट मसाला) मिक्स करावेत. ६. सर्व गोष्टी नीट मिक्स कराव्यात. ७. हाताच्या तळव्याला एक थेंब तेल लावून घ्यावे आणि वर बनवलेल्या मिश्रणापासून छोट्या आकाराचे पॅटिस बनवून घ्यावेत, ते पांढऱ्या तिळांमध्ये बुडवून एक प्लेटमध्ये बाजूला ठेवून द्यावेत. ८. एक तवा हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करकरत ठेवावा, ह्या तव्याला ब्रशने १ थेंब तेल सर्व बाजूने नीट लावून घ्यावे. ९. आता हे पॅटीस तव्यावर सावकाशपणे ठेवावेत. १०. पॅटिस दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत नीट भाजून घ्यावेत. ११. आता एका प्लेटमध्ये हे पॅटिस नीट ठेवावेत. १२. त्यावर थोडे दही घालून घ्यावे. १३. आता ह्यावर आवडीप्रमाणे आंबटगोड चिंचेची चटणी, हिरवी आणि लाल चटणी घालून घ्यावी (१/४ टी स्पून). १४. ह्यावर थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला पखरून घ्यावा. १५. आता सजावटी साठी एक उकडलेला बटाटा ह्यावर खिसुन घालावा जेणेकरून त्याला शेव घातल्याचा लुक येईल. (हि कमी कॅलरीयुक्त रेसिपी असल्यामुळे आपण ह्यामध्ये शेवेचा वापर केलेला नाही). १६. ह्या चटपटीत दही पॅटिस चाट चा आस्वाद मनमुराद लुटा: · जसे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा · जेवण म्हणून सुद्धा तुम्ही ह्याचा आस्वाद लुटू शकता