
झटपट दही-कोबी
झटपट दही-कोबी
साहित्य
१. कोबी- २५० ग्रॅम
२. दही- ३ टेबल स्पून
३. मीठ- चवीप्रमाणे
४. डेक्सट्रोस- १ टी स्पून (दही आंबट असेल तर)
५. मिरची पूड (तिखट)/ चिली फ्लेक्स- १/४ टी स्पून
६. धने जिरे पूड/ ओरेगॅनो- १/४ टी स्पून.
७. चाट मसाला- १/२ टी स्पून
८. तीळ- १/४ टी स्पून (पर्यायी)
९. कोथिंबीर- सजावटीकरिता
पध्दत :
१. प्रथम २५० ग्रॅम कोबी न चिरता हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवावा. १५-२० मिनिटे झाल्यावर कोमट पाणी काढून टाकावे आणि कोबी स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावा.
२. आता हा कोबी चिरून घ्यावा.
३. चिरल्यानंतर गॅस/हॉटप्लेट/स्टोव्ह चा वापर करून साधारण १० मिनिटांसाठी कोबी एका भांड्यामध्ये वाफवून घ्यावा.
४. आता एक बाऊलमध्ये ३ टेबल स्पून दही फेटून घ्यावे. त्यामध्ये हवे असल्यास डेक्सट्रोस, मीठ घालावे. त्यानंतर धने जिरे पूड/ओरेगॅनो, तिखट/चिली फ्लेक्स, चाट मसाला, तीळ ह्यामध्ये घालून नीट मिक्स करून घ्यावे.
५. आता ह्यामध्ये वाफवलेला कोबी मिक्स करावा आणि मिश्रण नीट एकजीव करावे.
६. ह्यावर सजावटीसाठी म्हणून कोथिंबीर घालावी.
७. खाण्याच्या आधी थोड्यवेळासाठी हे मिश्रण फ्रीझ मध्ये ठेवावे.
८. आता तुमचा थंडगार झटपट दही-कोबी तया झालेला आहे.
सूचना:
- ह्या झटपट दही-कोबीचा आस्वाद तुम्ही विविध प्रकारे घेऊ शकता, जसे:
हे मिश्रण तुम्ही पोळी/भाकरी/भात ह्या सोबत खाऊ शकता. - हे सलाड म्हणून पण तम्ही खाऊ शकता.
- एक बाउल दही-कोबी दुपारी किंवा रात्री जेवणाच्या अगोदर खाल्यास डाएट च्या दृष्टीनं सुद्धा
फायद्याचे आहे