
मखानी पास्ता
बिनतेलाचा मखानी पास्ता
साहित्य
• मुख्यसाहित्य:
१. पास्ता – २०० ग्रॅ
२. टोमॅटो – ३/४
३. कांदा – २
४. उकडलेले बटाटा – १
५. लाल काश्मिरी मिरच्या – २
६. काश्मिरी पावडर – १ चमचा
७. डेक्सट्रोज – १ चमचा
८. लसूण – १ पाकळी
९. आलं – १/२ इंच
१०. मीठ – चवीनुसार
११. दूध – १/२ कप
पध्दत :
१. प्रेशर कुकरच्या एका ड्ब्यात चिरलेले टोमॅटो, कांदे, लसूण, आले, बटाटे घ्यावेत. त्यात लाल तिखट व दूध घालावे.
२. दुसर्या डब्यात २०० ग्रॅम पास्ता घ्यावा आणि त्यात अर्धा ग्लास पाणी व मीठ घालावे.
३. प्रेशर कुकरमध्ये दोन्ही डब्यातील पदार्थ जवळजवळ २ शिट्या होईपर्यंत शिजवावेत.
४. हे सर्व थंड होऊ द्यावे.
५. टोमॅटो आणि कांद्याचे शिजवलेले मिश्रण, दूसर्या डब्यातील इतर पदार्थांसह बारीक वाटून घ्यावेत.
६. आता हे वाटप एका गरम भांड्यात घ्यावे.
७. सुमारे ८-१० मिनिटे शिजवावे.
८. त्यात मीठ व डेक्स्ट्रोज घालून व्यवस्थित मिसळावे.
९. हे मिश्रण उकळू लागले की आपला मखानी सॉस तयार झाला.
१०. या सॉसला दुसर्या भांड्यात घ्यावे व इथे ही हा सॉस उकळण्यास सुरवात झाली की त्यात उकडलेला पास्ता घालावा व जोपर्यंत सर्व मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत चांगले ढवळावे.
११. हे मिश्रण घट्ट झाल्यावर गरम गरम वाढावे.
टीप – हा मखानी सॉस मखानी भाजी, पनीर मखानी किंवा बटर चिकनसाठी देखील वापरला जाऊ शकतो.
आपल्या ह्या हॉट मखानी पास्ताचा आस्वाद कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता घ्यावा. कारण ह्यात तेल, तूप, बटर किंवा चीज अजिबात नाही आहे. पण तरीही तेवढाच स्वादिष्ट आहे.