22 May 2018

कमी कॅलरीयुक्त भोपळ्याचे सूप

 

भोपळ्याचे सूप

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. लाल भोपळा – २५० ग्रॅम
२. कांदा – २
३. दूध – २०० मिली
४. डेक्सट्रोझ /साखर – १ टेबल स्पून
५. लसूण – ४/५ पाकळ्या
६. हिरवी मिरची – १ लहान
७. धणे-जिरे पूड – १ टी स्पून
८. मीठ – चवीप्रमाणे
९. कोथिंबीर – सजावटीसाठी

 

पध्दत :

१. प्रथम लाल भोपळ्याची साल काढून घ्या.
२. त्याचे चौकोनी आकाराचे छोटे तुकडे करून घ्या.
३. हे तुकडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी भिजत ठेवा.
४. वीस मिनिटे झाल्यावर हळद मीठ घातलेले कोमट पाणी गाळून घ्या आणि भोपळ्याचे तुकडे स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या.
५. आता दोन कांदे लांबट तुकड्यांमध्ये चिरून घ्या.
६. लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून घ्या.
७. एका लहान हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या.
८. आता हे चिरलेले कांदे एक प्रेशर कुकर मध्ये ठेवा व त्यात थोडेसे मीठ घाला.
९. हा प्रेशर कुकर गॅस/ हॉटप्लेट/स्टोव्ह (उपलब्धतेनुसार) वर ठेवावा आणि त्याचे झाकण न बंद करता आतील कांदा चांगला गुलाबी व नरम होईपर्यंत परतून घ्यावा.
१०. आता ह्या परतलेल्या कांद्यामध्ये ठेचलेला लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, भोपळ्याचे तुकडे आणि अर्धे दूध मिक्स करा.
११. आता सर्व गोष्टी कुकरचे झाकण बंद न करता नीट परतून घ्या.
१२. परतून झाल्यावर कुकरचे झाकण बंद करा आणि दोन शिट्ट्या होऊ द्या.
१३. दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस/स्टोव्ह/हॉटप्लेट बंद करा आणि हे मिश्रण कुकरमध्येच थंड होऊ द्या.
१४. थंड झाल्यावर हे सर्व घटक मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या.
१५. मिक्सर मध्ये वाटत असताना ह्यामध्ये उरलेले दूध, साखर/डेक्सट्रोज, मीठ आणि धणे- जिरे पूड मिक्स करा.
१६. ह्याचे नीट एकजीव मिश्रण बनवून घ्या.
१७. आता हे मिश्रण नीट उकळे पर्यंत गरम करून घ्या.
१८. सजावटीसाठी ह्यावर थोडी कोथिंबीर घालून घ्या.
१९. हे झाले सूप तयार ते गरमागरम प्यायला घ्या.
२०. अशाप्रकारे तुम्ही कमी कॅलरीयुक्त, चविष्ट, आणि पौष्टिक अशा लाल भोपळ्याच्या सूप चा आस्वाद घेऊ शकता.

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/pumpkin-soup-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply