lal bhopla raita, red pumpkin
25 Dec 2018

लाल भोपळ्याचे रायते

 

लाल भोपळ्याचे रायते

 

 

साहित्य

   १. लाल भोपळा – २५० ग्रॅम
   २. साखर – १/४ चमचा (जर भोपळा गोड नसेल तर)
   ३. मीठ – चवीनुसार
   ४. जिरे – १/४ चमचा
   ५. हिरवी मिरची – १ नग
   ६. दही – २ मो टेबलस्पून (मोठा चमचा)
   ७. कोथिंबीर – १ टेबलस्पून (मोठा चमचा)

 

पध्दत :

१.     प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून  घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२.     भोपळ्याचे लहान चौकोनी आकाराचे तुकडे करुन घ्यावेत.
३.     साधारण ५ ते ८ मिनिटे या लाल भोपळ्याच्या तुकड्यांना वाफवून घ्यावे.
४.     आता आवडीनुसार व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर भांडे गरम करुन घ्यावे.
५.     भांडयात जिरे व हिरवी मिरची घालावी आणि चांगले परतून घ्यावे.
६.     आता त्यात वाफवलेल्या भोपळ्याचे तुकडे घालावेत व पुन्हा चांगले परतून घ्यावे.
७.     यामध्ये मीठ व साखर घालावी व पुन्हा एकदा नीट परतून घ्यावे.
८.     भांड्यावर झाकण ठेवून सर्व पुन्हा ५ मिनिटे वाफवून घ्यावे.
९.     आता गॅस बंद करुन हे सर्व थंड होऊ द्यावे.
१०.     थंड झाल्यावर त्यात दही घालावे व सर्व नीट ढवळून घ्यावे.
११.     सरतेशेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व सर्व चांगले मिसळावे.
१२.     आता हे रायते खाण्यासाठी तयार झाले आहे.
१३.     हे रायते आपण एकतर फ्रीजमध्ये थंड करुन ते सॅलडसारखे खाऊ शकतो
किंवा
१४.     हे रायते आपण भात / भाकरी / चपाती बरोबर ताबडतोब खाऊ शकतो.
१५.    ह्या रायत्यामध्ये खूपच कमी कॅलरीज आहेत कारण ह्यामध्ये जराही तेल वापरण्यात आलेले नाही. पण हे तितकेच चवदार व आरोग्यदायी आहे.

 

 

English

Leave a Reply