16 Jan 2019

शेझवान सॉस

 

कमी कॅलरीजचा शेझवान सॉस

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. लाल मिरची (काश्मिरी) – ६/७ नग (ही कमी तिखट असते आणि मुख्यत्वे पदार्थाला
लाल रंग येण्यासाठी वापरली जाते)

२. लसूण – ०६ पाकळ्या
३. आले – साधारण १ इंच
४. हिरवी मिरची – १ नग
५. टोमॅटो – २ नग
६. कांदा – १ नग
७. तेल – १ थेंब
८. मीठ चवीनुसार

 

पध्दत :

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून 
घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. आले, लसणाच्या ३ पाकळ्या व हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यावी.
३. एका पातेल्यात कोमट पाणी घ्यावे व त्यात लाल काश्मिरी मिर्च्या व लसणाच्या उरलेल्या ३ पाकळ्या १५–२० मिनिटे भिजवाव्यात.
४. हे मिश्रण टोमॅटो व कांद्यांसोबत मिक्सरमधून एकजीव पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यावे. (ही पेस्ट ’टोमॅटो प्युरी’ सारखी झाली पाहिजे).
५. एक कढई (सॉस पॅन) हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर वर ठेवून गरम करुन घ्यावी व कढईस आतून एक थेंब तेल नीट लावून घ्यावे.
६. ह्यात आले, लसूण व हिरवी मिरची घालावी.
७. आता वास सुटेपर्यंत व सर्व बदामी रंगावर नीट परतून घ्यावे.
८. मग त्यात आपण अगोदर तयार केलेली प्युरी घालावी.
९. आता ह्यात आवश्यकतेनुसार व चवीनुसार मीठ घालावे.
१०. आता त्यावर झाकण ठेवून ८–१० मिनिटे शिजू द्यावे.
११. हे मिश्रण जरा जाडसर होऊ द्यावे.
१२. आता गॅस बंद करावा व सर्व पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
१३. आता आपला लो-कॅलरी शेझवान सॉस तयार झाला आहे. आपण आपल्या आवडत्या पदार्थांसह जसे की, सँडविच, फ्रँकी, नूडल्स, फ्राइड राइस, बर्गर इत्यादीं सोबत ह्याचा आस्वाद घेऊ शकता. 

या कमी मसालेदार पण तितक्याच आरोग्यदायी व चविष्ट… शेझवान सॉसचा आनंद घ्या, आणि ते ही कोणत्याही अपराधीपणाच्या भावने शिवाय.

English

Leave a Reply