30 Oct 2018

झटपट टोमॅटो ऑमलेट

 

लो कॅलरी झटपट टोमॅटो ऑमलेट

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. मूग डाळ पीठ – १५० ग्रॅम
२. कांदा – १
३. टोमॅटो – १
४. हळद पावडर – १/४ टीस्पून
५. संडे मसाला – १ टीस्पून
६. धणे-जिरे पावडर – १/२ टीस्पून
७. पांढरे तीळ – १/२ टीस्पून
८. धणे – १ टेबलस्पून
९. मीठ – चवीनुसार
१०. तेल – ब्रशिंगसाठी
११. पाणी – १ ग्लास

 

पध्दत :

१. सर्वप्रथम सगळ्या भाज्या साल न काढता कोमट पाण्यामध्ये हळद व मीठ घालून १५-२० मिनिटे भिजवाव्यात. या भाज्या १५-२० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
२. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
३. मिक्सिंग बाऊलमध्ये मूगडाळीचे पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या.
४. सर्व मसाले जसे कि संडे मसाला, धणे-जिरे पावडर, हळद पावडर, पांढरे तीळ यामध्ये घाला.
५. आपल्या चवीनुसार मीठ घाला.
६. आता या मिश्रणामध्ये हळूहळू पाणी घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. (डोशाच्या पीठासारखे)
७. आता एक पॅन हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर गरम करून घ्या.
८. साधारण एक थेंब तेल घेऊन ब्रशने ते सगळीकडे पसरवून घ्या.
९. आता एक डाव / पळीभर हे पीठ घेऊन ते उत्तप्प्यासारखे पॅनवर पसरवा.
१०. आता पॅनवर झाकण ठेवून द्या.
११. ऑमलेट दोन्ही बाजूंनी कुरकुरीत व सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
१२. तुमच्या आवडत्या सॉसबरोबर किंवा थंड दह्याबरोबर हे ऑमलेट गरम गरम वाढू शकता.
१३. आपल्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी या लो-कॅलरी झटपट टोमॅटो ऑमलेटचा आनंद आपण घेऊ शकता. टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे घरी आल्यास हा खूप चांगला पर्याय आहे.

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/tomato-omelette-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply