03 Oct 2018

भाज्यांचे कोलस्लो

 

कमी कॅलोरीचे भाज्यांचे कोलस्लो

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. घरी बनवलेला कमी कॅलरीजचा मेयोनेझ सारखा सॉस – २०० ग्रॅ
२. गाजर – २
३. कोबी – १०० ग्रॅ
४. मीठ – चवीनुसार
५. मिश्र हर्ब्स / धने-जिरे पावडर – १/२ चमचा (छोटा)
६. चिली (मिर्ची) फ्लेक्स / मिरची पावडर – १/४ चमचा (छोटा)
७. चाट मसाला – भुरभुरण्यासाठी

 

पध्दत :

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. कोबी व गाजर किसून घ्या.
३. एका वाड्ग्या मध्ये घरी बनवलेला कमी कॅलरीजचा थंडगार मेयोनेझ सारखा सॉस काढून घ्या.
४. हा सॉस चांगला फेटून घ्यावा व त्यात किसलेला कोबी व गाजर घालावे.
५. या सॉस मध्ये वर उल्लेखलेल्या सर्व साहित्याचा समावेश करावा (मिश्र हर्ब्स, धणे-जिरे पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स / मिरची पावडर) व मीठ ही घाला.
६. या मिश्रणावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा.
७. हा पदार्थ थंडगारच सर्व्ह करावा :
· एक वाडगाभर, जेवण एक भाग म्हणून किंवा
· कोशिंबीर म्हणून किंवा
· सॅन्डविच/ ओपन सबस / फ्रँकीज मध्ये सारण म्हणून वापरुन टिफिन्स मध्ये ही नेता येते किंवा
· पोळी वा भाकरी बरोबरही खाता येते.

८. आता कोणत्याही अपराधी भावने शिवाय आपल्या आवडत्या लो कॅलरी भाज्यांचे कोलस्लोचा आनंद घ्या.

 

[button link=”http://www.healthonics.healthcare/vegetable-coleslaw-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply