04 Aug 2020

बैंगन चटपटा

 

बैंगन चटपटा

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. बोट वांगी (इटालियन एगप्लान्ट) / वांगी – २
२. हळद – १/४ छोटा चमचा
३. लाल तिखट – १/२ छोटा चमचा
४. धणे-जिरे पूड – १/४ छोटा चमचा
५. मीठ – चवीनुसार
६. तेल – थोडेसे (ब्रशने भांड्याला आतुन लावून घेण्यापुरते)
७. कोथिंबीर – सजावटीसाठी

फोडणीसाठी:
१. मोहरी – १/४ छोटा चमचा
२. तीळ – १/४ छोटा चमचा

 

पध्दत :

१. वांग्याचे (इटालियन एगप्लान्ट) छोटे तुकडे करुन ते पाण्यात बुडवून ठेवावेत.

२. उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्ह वर कढई गरम करुन घ्यावी व ब्रशने एक थेंब तेल नीट लावून घ्यावे.

३. गरम झालेल्या कढईत राई व तीळ घालावेत.

४. राई व तीळ तडतडू लागले की त्यात हळद घालावी व ५ सेकंद परतून घ्यावे.

५. त्यानंतर, ह्या कढईत वांग्याचे कापलेले तुकडे नीट परतून घ्यावेत.

६. आता त्यात लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून पुन्हा २ मिनिटे नीट परतून घ्यावे.

७. मग चवीनुसार मीठ घालावे.

८. कढईवर झाकण ठेवून जवळजवळ ८-१० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.

९. साधारण १० मिनिटे झाल्यावर पदार्थ नीट शिजला आहे का, हे पाहणे.

१०. हा पदार्थ नीट शिजला असल्यास मऊ होतो.

११. आता चिरलेली कोथिंबीर त्यावर घालावी.

१२. चपाती / भाकरी / डाळ-भाताबरोबर ह्या कमी-कॅलरीजच्या स्वादिष्ट चमचमीत वांग्याच्या भाजीचा आस्वाद घ्यावा.

 

English

Leave a Reply